Ladka Bhau Yojana 2024 महाराष्ट्र सरकार मार्फत लवकरच लाडकी बहीण योजनेनंतर सुरू होणार आहे लाडका भाऊ योजना. लाडक्या भाऊ योजना संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खूप मोठी घोषणा केली आहे.पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापूजा नंतर मुख्यमंत्री यांनी या योजनेची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत कोणा कोणत्या उमेदवारांना फायदा होईल.
तर या योजनेअंतर्गत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना – 6,000 रुपये देण्यात येणार आहे.
तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये देण्यात येईल .
तसेच पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपन देण्यात येईल.
याच योजने संदर्भात माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिस करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव येईल व त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळू शकते.
त्यानुसार जे ही उमेदवार या योजनेअंतर्गत तरुण-तरुणी कारखान्यात काम करतील अप्रेंटिसशिप करतील तिथे टाईम साठी आपले सरकार हे पैसे भरणार आहेत या योजनेद्वारे बेरोजगारांना सरकारमार्फत उपाय शोधला आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मात्र इथे एक अट देखील आहे की सर्वच उमेदवारांना ही विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळणार नाहीये
या योजनेअंतर्गत अशाच उमेदवारांना ह्यो याजनेचा लाभ मिळेल जे विद्यार्थी कंपनीत अप्रेंटिसिप करतील अशाच विद्यार्थ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे बारावी उत्तीर्ण डिप्लोमा धारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायफन म्हणून प्रत्येक महिन्याला ही ठराविक रक्कम देणार आहे.
लाडका भाऊ या योजनेअंतर्गत अप्रेंटिसशिप रक्कम स्वतः राज्य सरकार देणार असून या योजनेचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तसेच उमेदवारांनी या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे.
या साठी उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वरून उमेदवार नोंदणी करू शकतात.
नोंदी करत असताना उमेदवाराने नवीन युजर म्हणून पर्याय निवडल्यानंतर त्यामध्ये त्याचे नाव पत्ता आणि वयोगट ही सर्व माहिती भरायची आहे.
लाडका भाऊ योजना अटी व शर्ती
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते कमाल 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता 10 वी /बारावी पास/आयटीआय /पदवीधर /पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
तसेच ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
उमेदवाराचे आधार कार्ड नोंदणी असावी तसेच उमेदवाराचे बँक खाते आधाराशी संलग्न असावे.
तसे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता व आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे गरजेचे आहे.
त्यामुळे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देणार असून यासोबतच तुम्हाला पगाराचा लाभ मिळू शकेल.
तसेच यामध्ये एक अजून देखील आहे की या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर त्याला त्या महिन्याचे वेतन मिळणार नाही तसेच उमेदवार पहिल्याच महिन्यात सोडून गेल्यास तो योजनेसाठी पुढे पात्र ठरणार नाही.
लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी लिंक पहा
लाडका भाऊ योजना ऑनलाइन लिंक – Apply Now