Anandacha Shida 2024:लवकरच राज्यातील या नागरिकांचा गणेशोत्सव होईल गोड नेमका कोणत्या तारखेपासून मिळणारे आनंदाचा शिधा

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Anandacha Shida 2024 -लवकरच या नागरिकांना गणेश उत्सवाच्या दरम्यान मिळणार आहे आनंदाचा शिधा. कारण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा गणेशोत्सव मध्ये दिला जाईल. तर खास महाराष्ट्र सरकारमार्फत 562 कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे.याबद्दल राज्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला आहे.

Anandacha Shida 2024

आनंदाचा शिधा कधी मिळणार?

तर येत्या गणेशोत्सवामध्ये नागरिकांना 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ही पाच प्रणाली मार्फत केवळ 100 रुपयांमध्ये सरकारकडून आनंदाचा शिधा चे वाटप करण्यात येणार आहे. यामार्फत दारिद्र्य रेषेखालील केशरी शिधापत्रिका धारी नागरिकांना कमीत कमी दरात आनंदाचा शिधा वाटप महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात येणार आहे. 

आनंदाचा शिधा योजनेसाठी एकूण किती खर्च लागणार आहे? 

आनंदाचा शिधा वाटप या योजनेसाठी अंदाजे 5 43.21 कोटी आणि व या योजनेसाठी इतर खर्चामध्ये 19.3 कोटी असा खर्च लागणार असून याची एकूण टोटल 562.51 कोटी इतका या योजनेसाठीचा प्रस्तावित खर्च असणार आहे. तसेच आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी 21 दिवसांनी आता फक्त आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

आनंदाचा शिध्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी मिळणार? 

आनंदाच्या शिधा मध्ये एक किलो चणा डाळ साखर एक लिटर सोयाबीन तेल असा वस्तूंचा समावेश असणार आहे. 

 आनंदाचा शिधा कोणा कोणालामिळणार आहे?

तर महाराष्ट्र राज्यातील अत्यंत आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिका धारक या आनंदाच्या शिद्याचा लाभ घेऊ शकणार नाहीत तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशन कार्ड धारक उमेदवार या सवलतीच्या खाद्य वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारी आकड्यानुसार 1,70,82,086 इतक्या शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment