Maharashtra Talathi Bharti 2023:-खूप दिवसांपासून काही ना काही कारणास्तव रखडलेल्या महाराष्ट्र तलाठी भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 26 जून 2023 पासून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील होणार आहे व अर्ज करण्याचा शेवटची तारीख ही 17 जुलै 2013 असणार आहे.तलाठी पदासाठी चा पगार हा 25,500 ते 81,100 इतका असणार आहे.Talathi Bharti 2023 च्या संदर्भातील महाराष्ट्र तलाठी भरती च्या जाहिराती पासून ते अर्ज करण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला खालती पाहयला
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा ,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
Maharashtra Talathi Bharti 2023 | Talathi Bharti 2023 | Talathi Bharti Notification PDF Download | Talathi Bharti Online Form | Talathi Bharti Last Date | Talathi Bharti 2023 Online Form Date 2023 | Talathi Bharti Document | Talathi Bharti Qualification | Eligibility | Age Limit Direct Apply Link | Talathi Bharti Syllabus | Talathi Bharti 2023 Update
चला तर मग पाहूया उमेदवार कशाप्रकारे तलाठी भरती २०२३ मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.
जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
Talathi Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – तलाठी [Talathi Bharti 2023]
एकूण पदसंख्या – 4644
अर्ज शुल्क – General – ₹1000/-
मागासवर्गीय – ₹900/-
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17/07/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.mahabhumi.gov.in
Talathi Recruitment 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]
मित्रांनो आता आपण पाहूया की जिल्हा निहाय Talathi Recruitment 2023 कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
अ. क्र | जिल्ह्याचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | संभाजीनगर | 161 |
2 | अकोला | 41 |
3 | अमरावती | 56 |
4 | बीड | 187 |
5 | भंडारा | 67 |
6 | अहमदनगर | 250 |
7 | बुलढाणा | 49 |
8 | चंद्रपूर | 167 |
9 | धुळे | 205 |
10 | गडचिरोली | 158 |
11 | गोंदिया | 60 |
12 | हिंगोली | 76 |
13 | जालना | 118 |
14 | जळगाव | 208 |
15 | कोल्हापूर | 56 |
16 | लातूर | 63 |
17 | मुंबई उपनगर | 43 |
18 | मुंबई शहर | 19 |
19 | नागपूर | 177 |
20 | नांदेड | 119 |
21 | नंदुरबार | 54 |
22 | नाशिक | 268 |
23 | उस्मानाबाद | 110 |
24 | परभणी | 105 |
25 | पुणे | 383 |
26 | रायगड | 241 |
27 | रत्नागिरी | 185 |
28 | सांगली | 98 |
29 | सातारा | 153 |
30 | सिंधुदुर्ग | 143 |
31 | सोलापूर | 197 |
32 | ठाणे | 65 |
33 | वर्धा | 78 |
34 | वाशिम | 19 |
35 | यवतमाळ | 123 |
36 | पालघर | 142 |
Maharashtra Talathi Bharti 2023 | Talathi Bharti Qualification [शैक्षणिक पात्रता]
तलाठी भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे.
तसेच उमेदवार शासन निर्णय मध्ये नमूद केल्याप्रमाणे संगणक व माहिती तंत्रज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जर उमेदवार संगणक माहिती तंत्रज्ञान परीक्षा उत्तीर्ण नसेल तर त्याला नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्ष च्या आत संगणक माहिती तंत्रज्ञान परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवार माध्यमिक शाळांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.
Krushi Vibhag Bharti 2023 | Click Here |
Age Limit for Talathi Bharti 2023 [Notification]
तलाठी भरती 2023 साठी 17 जुलै 2023 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.
मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन निर्णयाप्रमाणे पाच वर्ष सूट देण्यात आली आहे.
ओबीसी उमेदवारासाठी शासन निर्णयाप्रमाणे तीन वर्षे सूट देण्यात आली आहे.
या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.
Talathi Bharti Information 2023 [Talathi Bharti Selection Process [निवड प्रक्रिया]
तलाठी भरतीसाठी उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ट घेण्यात येईल.
या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.
2022 च्या तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी येथील कमीत कमी अहर्ता असल्याने सदर पदासाठी परीक्षेच्या दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. परंतु मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक शाळा अंतर परीक्षेच्या इयत्ता बारावीच्या दर्जाचा समान आहे.
तलाठी भरती लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर एकूण प्रत्येक विषयासाठी 50 गुण ठेवण्यात आले आहे.
तलाठी भरतीची लेखी परीक्षा एकूण 200 गुणांची असते.
उमेदवाराला तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी एकूण गुनांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असेल.
परीक्षेचा निकाल अंतिम निवड सूची जाहीर करताना परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र शासन निर्णय नियमानुसार नमूद निकषांच्या आधारे केला जाईल.
Talathi Bharti Exam Pattern information in Marathi [परीक्षा स्वरूप]
अनुक्रमांक | विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|---|
1 | मराठी | 25 | 50 |
2 | इंग्रजी | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | सामान्य योग्यता | 25 | 50 |
5 | ऐकून गुण | 100 | 200 |
अ. क्र | विषय | सविस्तर तपशील |
---|---|---|
१. | मराठी | मराठी व्याकरण – [वाक्यरचना,शब्दार्थ प्रयोग,समास,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द] |
2 | सामान्य ज्ञान | इतिहास भूगोल,भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान,चालू घडामोडी,माहितीचा अधिकार ,अधिनियम 2005 माहिती व तंत्रज्ञान ,संगणकाशी संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक चा समावेश असणार आहे. |
3 | बौद्धिक चाचणी | अंक मालिका अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सहसंबंध अंक,अक्षरा,आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती इत्यादी. अंकगणित – बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार काळ काम वेग संबंधित उदाहरणे विचारले जातात.सरासरी नफा-तोटा सरळ व्याज,चक्रवाढ व्याज,चलन मापनाची परिणामी इत्यादी. |
4 | इंग्रजी | grammer ,synonyms spelling ,punctuation tense and kinds of Tense, sentence, fashion bag, voice nareshan article question tag, Fill in the blanks in the sentence, Simple sentence ,structure aero types of sentence. |
Talathi Recruitment 2023 Fees
तलाठी पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000/-अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
तसेच राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी -900/-
माझी सैनिकांसाठी कोणताही प्रकारची परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
Railway Vacancy 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचे प्रमाणपत्र
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा उमेदवाराकडे असावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र.
अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र.
मात्र माजी सैनिक असल्याचा संबंधित उमेदवाराकडे प्रमाणपत्र असावे.
अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
प्रकल्पग्रस्ता आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र असावे.
एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा.
अनारकी व महिला मागासवर्गीय आदुब खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवासी प्रमाणपत्र लागेल.
मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दहावी बारावी च्या मार्कशीट मध्ये मराठी विषय असावा.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
अनुभव प्रमाणपत्र असल्यास
How to Apply Talathi Bharti 2023
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो.
एका उमेदवाराला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज करता येणार नाही.
एखाद्या विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी अर्ज केल्याचे आढळल्यास त्याचे सर्व अर्ज अपात्र करण्यात येईल.
तसेच जर एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यामध्ये दोन-तीन अर्ज केल्यास अशा परिस्थितीत उमेदवारांनी शेवटचा केलेला अर्ज फक्त ग्राह्य धरला जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने फक्त या संकेतस्थळा चा करायचा आहे. https://mahabhumi.gov.in
Important Notes For Talathi Bharti 2023
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो.
एका उमेदवाराला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज करता येणार नाही.
एखाद्या विद्यार्थ्याने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी अर्ज केल्याचे आढळल्यास त्याचे सर्व अर्ज अपात्र करण्यात येईल.
तसेच जर एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यामध्ये दोन-तीन अर्ज केल्यास अशा परिस्थितीत उमेदवारांनी शेवटचा केलेला अर्ज फक्त ग्राह्य धरला जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने फक्त या संकेतस्थळा चा करायचा आहे. https://mahabhumi.gov.in
उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर दिले दिलेल्या दिनांकापर्यंत जर अर्ज शुल्क भरले नाही तर अशा उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.26 जून 2023 असणार आहे. व शेवटची तारीख असणार आहे 17 जुलै 2023.त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती पाहायला भेटेल यासाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला जॉईन करा.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी.तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.
Important Links for Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Direct Online Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here
Maharashtra Talathi Bharti 2023 Important Dates
Application Start Date – 26/06/2023
Last Date for Application – 17/07/2023 Date Extended 18/07/2023
2 thoughts on “Maharashtra Talathi Bharti 2023-तब्बल 4644 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध-तारिख-18 जुलै-Apply Now”