आचारसंहिता आहे तरी काय ? तुम्हाला माहित आहे का नेमकी आचारसंहिता का लावली जाते?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Aachar Sahita Ka Lavli jate – निवडणूक आयोगामार्फत जेव्हा ही निवडणूक जाहीर होतात त्यावेळी सगळ्यांच्या कानावर पडणारा शब्द म्हणजे आचारसंहिता. आजच्या लेखात आपण हेच पाहणार आहोत कि नेमकं हे आचारसंहिता आहे तरी काय? तर निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाकडून कोणताही प्रकारचा पक्षपात केला जाऊ नये म्हणून व लोकशाही टिकून राहावे यासाठी स्वतंत्र असे निवडणूक आयोग काम करत असते. प्रामाणिकपणे निवडणुका व्हाव्या व लोकांच्या मताचा दुरुपयोग होऊ नये यासाठीच निवडणूक आयोग काही नियम बनवतात. हेच नियम जेव्हा निवडणूक जाहीर होते त्याच्या नंतर लगेचच आचार संहिता म्हणून लागू होतात. हे सर्व नियम निवडणूक लढणाऱ्या सर्व पक्षांना व त्यातील सर्व उमेदवारांना बंधनकारक असतात. व त्या सर्व नियमांचे पालन करणे उमेदवारांसाठी आवश्यक असते. कोणत्याही पक्षाकडून किंवा त्याच्या उमेदवाराकडून झाल्यास त्याच्यावर निवडणूक आयोगामार्फत कठोर कारवाई केली जाऊ शकते.

आचारसंहिता नेमका आहे काय? [ Aacha Sahita Kay Aste ]


आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचे उमेदवार पाळण्याचे काही नियम असतात व हे नियम जेव्हा ही निवडणुका डिक्लेअर होतात.

तेव्हा हे सगळे नियम लावले जातात जेणेकरून कोणताही राजकीय पक्ष निवडणुकी मध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू शकणार नाही. व ही प्रक्रिया निवडणूक संपेपर्यंत राबवली जाते.

आचारसंहिता नेमकी कधी पासून लागू होते?


तर निवडणूक आयोग जेव्हा ही निवडणुकांच्या तारखा जाहीर करतात. तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते. निवडणुका पार पडेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहते.

आचारसंहिता नेमकी कुठे कुठे लागू शकते? [ Loksabha Election Aacha Sahita ]

तर लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू होते तर जेव्हाही विधानसभे ची निवडणूक असते मात्र त्यावेळेस फक्त संबंधित राज्य आचारसंहिता लागू होते.

तसेच संबंधित मतदार संघामध्ये ही आचारसंहिता लागू होते

आचारसंहिते संबंधित काही मुख्य नियम ?


तर आचारसंहिते संबंधित काही मुख्य नियम जे की तुम्हाला
माहित असले पाहिजे.


तर आचारसंहितेमध्ये तुम्ही सरकारी यंत्रणेचा गैरवापर करू शकत नाही.

WhatsApp Group Link


त्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुकीच्या परीक्षेला मर्यादा येते.


त्यानंतर तुम्ही कोणत्या ही प्रकारच्या मतदार वर्गात धमकावणे प्रभावित करणे मतदार वर्गास आमिष दाखवणे अशा प्रकारे कोणती प्रतिबंध करू शकत नाही.


त्यानंतर सभा रॅली आणि बैठकांसाठी वेळ आणि जागेची मर्यादा आचार संहिता मध्ये येते.

आचारसंहितेचे नेमके काय फायदे असतात?

आचारसंहितेमध्ये सर्व पक्षांना समान संधी मिळते.

आचारसंहितेमुळे पक्ष यांच्या पैशाचा गैरवापर करून किंवा भ्रष्टाचार करू शकत नाही यामुळे आचारसंहितेचा खूप मोठा फायदा आहे.

तसेच निवडणूक शांततापूर्ण आणि कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप न होता पार पडते.

व यामुळे मतदारास योग्य निर्णय मदत होते.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग काय करते?


जर कोणत्याही पक्षामार्फत आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर निवडणूक आयोगामार्फत त्यांच्यावर त्यांनी केलेल्या संबंधित जे काही शिक्षा आहे की त्यांना केली जाते जसे की उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखणे त्याच्याकडून दंड आकारणे किंवा त्या उमेदवारास तेथील निवडणूक रद्द करणे अशा कारवाईचा यामध्ये समावेश आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment