Cast Certificate Online Process| घरबसल्या काढा कास्ट सर्टिफिकेट तेही 05 मिनिटात

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Cast Certificate Online Process -कास्ट सर्टिफिकेट, म्हणजेच जातीचा दाखला, हा आपल्या ओळखपत्रांचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा दाखला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, शैक्षणिक सवलतींसाठी, आणि इतर सामाजिक सेवांसाठी अनिवार्य असतो. कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया समजून घेतल्यास तुम्हाला कोणतेही अडथळे येणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया, कास्ट सर्टिफिकेट काढण्याची पायरी-पायरीनं प्रक्रिया.

Cast Certificate Document List [कास्ट सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्रं]

कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. खालील कागदपत्रं तुम्हाला तयार ठेवावी लागतील

जातीचा पुरावा: तुमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांकडे आधीपासून कास्ट सर्टिफिकेट असल्यास, ते कागदपत्र उपयुक्त ठरेल.

आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र: तुमची ओळख आणि पत्ता यांची खात्री करण्यासाठी हे आवश्यक आहे.

जन्म प्रमाणपत्र: वयाची खात्री करण्यासाठी.

शाळा सोडल्याचा दाखला: यात तुमची जात नमूद असलेली असते, त्यामुळे तेही उपयुक्त ठरतं.

शपथपत्र: काही ठिकाणी जातीचा दाखला बनवण्यासाठी शपथपत्राची आवश्यकता असू शकते.

How To Apply Cast Certificate In Maharashtra [कास्ट सर्टिफिकेट ऑनलाइन पद्धतीने कशाप्रकारे काढावे? ]

ऑनलाइन अर्ज भरणं: अनेक राज्यांमध्ये कास्ट सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याच्या ‘महासेवास’ वेबसाइटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करायचे आहे. 

तिथे तुम्हाला ज्या उमेदवाराच्या कोणताही डॉक्युमेंट काढायचा आहे उमेदवाराच्या नावाने तुम्हाला हे लॉगिन करायचा आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं. 

कारण त्याच उमेदवाराच्या नावाने तुम्ही कोणत्याही कागदपत्रासाठी अर्ज करू शकाल. त्यामुळे ही एक गोष्ट उमेदवाराने लक्षात ठेवावे. 

आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाने कोणतेही कागदपत्र काढायचे आहे. त्याच व्यक्तीच्या नावाने आपल्याला ह्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे. 

आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जो कोणता कागदपत्र काढायचा तो तिथे सर्च करायचा आहे.

तर इथे तुम्ही डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट अशाच प्रकारचे इतरही कागदपत्र तुम्ही काढू शकता. 

हे झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला नेमके कोणकोणते कागदपत्र अर्ज करता आणि द्यायचे ज्याच्यावर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जे काही कार्यकर्ता तुम्ही देणार आहात त्याचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 

Cast Certificate Apply Government Website – पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आहे तो एकदा रिचेक करायचा आहे. 

अर्जंट व्यवस्थितपणे बघून झाल्यानंतर काही चुकलं नसेल तर तुम्ही तो अर्ज सबमिट करू शकता. 

त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जी काही कास्ट सर्टिफिकेट ला लागणारी अर्ज शुल्क भरायचे आहे. ते भरल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी तुमचे कास्ट सर्टिफिकेट भेटेल त्याची माहिती तुम्हाला डिस्प्ले होईल.

ऑफलाइन अर्ज: जर ऑनलाइन अर्ज भरणं शक्य नसेल, तर स्थानिक तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा.

कागदपत्रांची पडताळणी: तुमच्या अर्जासह सादर केलेली कागदपत्रं तहसीलदार किंवा त्यांच्याकडील अधिकाऱ्यांनी तपासली जातात. जर सर्व कागदपत्रं व्यवस्थित असतील, तर पुढील प्रक्रिया सुरू होते.

तपासणी अहवाल: अर्जाच्या तपासणीनंतर संबंधित अधिकारी जात आणि पत्त्याची सत्यता तपासण्यासाठी तपासणी करतात. यात वेळ लागू शकतो, परंतु हे आवश्यक पाऊल आहे.

सर्टिफिकेट इश्यू: सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, तुमचं कास्ट सर्टिफिकेट तयार होऊन तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला हे सर्टिफिकेट कागदावर किंवा डिजिटली मिळू शकतं, यावर तुम्ही अर्ज कुठे केला आहे यावर अवलंबून आहे.

लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी हे करा Cast Certificate Document In Maharashtra

ऑनलाइन प्रक्रिया निवडा: शक्यतो ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वापरा. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि अर्जाची स्थिती ट्रॅक करणं सोपं होईल.

कागदपत्रं पूर्ण आणि व्यवस्थित ठेवा: आवश्यक सर्व कागदपत्रं तयार ठेवा आणि त्यांची झेरॉक्स प्रतही तयार ठेवा.

थोडं संयम ठेवा: कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे संयमाने प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पहा.

कास्ट सर्टिफिकेट मिळवल्यानंतर तुम्ही विविध सरकारी योजनांचा आणि सवलतींचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे, या प्रक्रिया सोप्या पद्धतीने पार पाडून आपला कास्ट सर्टिफिकेट मिळवा आणि त्याचे फायदे घ्या!


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment