गोरेगाव मुलुंड रस्त्यामुळे तासाचा प्रवास होणार काही मिनिटात तुम्हाला माहिती का?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Goregaon -mulund Road Project Update – मुंबई वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पर्याय म्हणून नेहमीच गोरेगाव मुलुंड रस्त्याची चर्चा होत असते.पण आता मुंबईतील नागरिकांचा वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यासाठी गोरेगाव मुलुंड लिंक रोड या प्रकल्प मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामार्फत गोरेगाव पूर्व येथून 4.70 किलोमीटर लांबीचे भूमिगत बोगदे केले जाणार असून त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अगदी जलद गतीने होऊ शकेल व वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल. ज्या प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर चालू असलेल्या कामाचा सर्वे करून बोगदाचे सरलेखन त्यातील विविध कामे किती आव्हानात्मक आहेत व कुठपर्यंत होत आली आहे. तसेच हे काम किती टप्प्यांमध्ये चालणार आहे या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

goregaon-mulund Link Road project Update

गोरेगाव मुलुंड लिंक रस्ता प्रकल्पाचे टप्पे खालील प्रमाणे

टप्पा एक प्रमाणे नाहूर स्टेशन रेल्वे मार्गावरील उडान पुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

टप्पा दोन प्रमाणे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता रुंदीकरण हाती घेतलेले काम 85 टक्के पूर्ण झाले असून मुलुंड पश्चिम येथील रस्त्यात रुंदीकरण चालू आहे.

टप्पा तीन – रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथे गोरेगाव पूर्व 1.26 किलोमीटर लांबीचा उडाणपूल खिंडीपाडा तानसा जलवाहिनी ते नाहुर येथील रेल्वे मार्गावरील पर्यंत 1.89 किलोमीटर लांबीचा उडाणपूल आणि जी जी सिंग रोड व गोरेगाव मुलुंड जवळ रस्ता इथे या प्रकल्पामध्ये त्रिस्तरीय चक्रीय मार्ग बनवण्यात येणार असून तसेच मुलुंड पश्चिम मधील हेडगेवार जंक्शन येथे उड्डाणपूल बनवला जाणार आहे याचे काम 22 टक्के पूर्ण झाले असून.

WhatsApp Group Link

टप्पा चार गोरेगाव मधील एक पॉईंट सहा किलोमीटरचा पेटी बोगदा व 4.7 किलोमीटरचा गोरेगाव पूर्व मधील जोड बोगद्याचे काम करण्याच्या कार्यादेश जारी करण्यात आला असून प्राथमिक सर्वे सुरू झाला आहे या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यामध्ये दहा टक्के काम पूर्ण झाले असून बाकीचे अजून बाकी आहे.

देशातील सर्वात अधिक लांबीचे बोगदे असणार आहेत
या प्रकल्पातील हे बोगदे गोरेगाव पूर्व येथून 4.70 किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे असणार या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गिका असतील हे बघू दे देशातील सर्वाधिक लांबीचे बोगदे असणार आहेत या बोगद्यांचा मार्ग गोरेगाव फिल्म सिटी खिंडीपाडापर्यंत असणार असून या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिकेसमोर असणार आहे हे काम पाच वर्षांमध्ये पूर्ण केले जाईल व केले जावे म्हणून या कामावर देखरेख नजर ठेवण्यासाठी महानगरपालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार देखील नेमला आहे ही दोन बोगदे करताना काही अडचणी देखील आल्या होत्या पण त्यातून आता मार्ग काढून महानगरपालिका काम पूर्ण करत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या काही भागांमधून हे दोन बोगदे जाणार असून या बोगद्यांची जमिनीपासून खोली असणार आहे 20 ते 25 मीटर आणि जास्तीत जास्त 100 मीटर खोलवर हे बोगदे असणार आहेत. जरी संजय गांधी नॅशनल पार्क चा काही भागांमधून हे भोगले जाणार असतील तरी त्या भागांना कोणत्याही प्रकारे धक्का न लागता व जैवविविधतेमध्ये कोणताही परिणाम न घडून देता हे काम पूर्ण केले जाणार आहे.

काय असतील या प्रकल्पामधील सोयी सुविधा

कोस्टल रोड प्रमाणे म्हणजेच सागरी किनारा मार्गात प्रमाणेच त्यांच्या बोगद्याप्रमाणेच गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यातील दोन्ही बोगद्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कव्हरेज असणार आहे तसेच अग्निशमन यंत्रणा ज्या काही सुख सुविधा मार्गिका चालू झाल्यानंतर लागतील त्या सर्व काही इथे बसवण्यात येणार आहे उदाहरण वेग मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा दिशादर्शक लावण्यात येणार आहे तसेच या बोगद्यांचा माध्यमातून मुंबईला सुरळीत व लवकरात लवकर पाणीपुरवठा करणारी 1800 मी व्यास क्षमतेची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आत्तापर्यंत गोळेगाव मुलुंड भागातून जाणाऱ्या सध्याच्या जमिनीवरील जलवाहिनीला पर्यायी पर्याय म्हणून ही भूमिगत बोगद्यातून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

आता तुमचा तासाचा प्रवास होणार काही मिनिटात?

सध्या नागरिकांना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरून मुलुंड ठाण्यापर्यंत जाण्यासाठी गावी जाण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तासाचा प्रवास करावा लागतो व कधीकधी जर खूपच विकेंड किंवा सुट्ट्या एकत्र आल्या तर हाच टाईम अडीच तीन तासावर देखील जातो व खूपच अशी वाहतूक कोंडी व मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळेच गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा वाहन चालकांसाठी एक चांगला सोयीस्कर आणि उत्तम असा पर्याय ठरेल जेणेकरून ट्राफिक मुळे होणारा मनस्तापाला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही व त्यांचा प्रवास सोयीस्कर होईल या प्रकल्प अंतर्गत पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलच्या बाजूचा पश्चिम द्रुतगती महामार्ग या मार्गाची जोडल्या जाईल व नागरिकांना लागणाऱ्या दीड दोन तासाचे रूपांतर या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांवर हा कालावधी येऊन पोहोचेल.

प्रकल्पासाठी लागणारा खर्च व त्यामधील वाढ

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचा एकूण खर्च 120 रुपये आहे या प्रकल्पासाठी 2023 24 मध्ये 1160 कोटी 95 लाख रुपये तरतूद करण्यात आली होती मात्र 24 25 मध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 1 हजार 870 कोटी रुपये तरतूद अजून देखील प्रस्तावित करण्यात आली आहे यासाठी लागणाऱ्या उपयोगिता सेवा वाहिणींच्या अतिरिक्त कामामुळे प्रकल्पात खर्च 47 कोटी रुपयांनी वाढणार आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment