GramSevak Bharti 2023-13000 ग्रामसेवक पदे भरणार

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Gramsevak Bharti 2023

Gramsevak Bharti 2023: विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात लवकरच राज्य सरकार मार्फत ग्रामसेवक या पदाची भरती प्रक्रिया सुरु होऊ शकते, एकूण 13000 रिक्त ग्रामसेवक पदे भरण्यात येणार आहे. याबाबत विविध जिल्हा परिषद मार्फत महिन्याच्या अखेरीस अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, ग्रामविकास मंत्री यांनी 2023 च्या अधिवेशनात ग्रामसेवक भरती होणार असे सांगितले होते. तर ग्रामसेवक भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अटी बघूया.

Gramsevak Bharti 2023 [ग्रामसेवक भरती 2023]

मित्रांनो (Village development officer) म्हणजेच ग्रामपंचायत सचिव होय, महाराष्ट्रा त 13000 ग्रामसेवक पदे रिक्त असल्याकारणाने जे ग्रामसेवक म्हणून आता कार्यरत आहे त्या ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक गावांचे काम करण्याचा भार पडतो त्यामुळेच राज्य सरकारने 2023 ची ग्रामसेवक भरती जाहीर केली होती. विविध कारणांमुळे ती भरती पुढे ढकलण्यात आली.पण आता भरतीचे कामे शेवटच्या टप्प्यात असून विविध जिल्हा परिषदेमध्ये लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल असे सांगण्यात येत आहे.

Gramsevak Bharti 2023 Age Limit [ ग्रामसेवक भरती वयाची पात्रता ]

वयोमर्यादा : ग्रामसेवकाची भरती देणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38 वर्ष दरम्यान असावे.

click Hereअशाच प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

GramSevak Salary [ग्रामसेवक पगार]

ग्रामसेवकाला सुरुवातीला कामावर रुजू झाल्यावर त्याला 7000 ते 21000 रुपयांपर्यंत पगार त्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देण्यात येतो.

ग्रामसेवक सुधारित वेतन श्रेणी नुसार Grade Pay 2% या सगळ्या गोष्टीचा समावेश होऊन त्याला 21,000 पर्यंत पगार होतो.

Gramsevak Bharti Documents [ ग्रामसेवक भरती कागदपत्र ]

ग्रामसेवक पद भरतीसाठी लागणारे ऑनलाईन कागदपत्र

दहावी किंवा बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला

पदवीधर असल्यास पदवी प्रमाणपत्र

दहावी व बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र

पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

इतर शिक्षण झाले असेल तर त्या चे प्रमाणपत्र

नॉन क्रिमिनल

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

अधिवास प्रमाणपत्र

[ EWS ] ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार

तसेच इतर काही आवश्यक कागदपत्र

अपंग प्रमाणपत्र

भूकंपग्रस्त प्रमाणपत्र

पाल्य प्रमाणपत्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रमाणपत्र

खेळाडू प्रमाणपत्र

Gramsevak Education Qualification [ ग्रामसेवक पात्रता ]

ग्रामसेवक भरती करणारा उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे.

व त्याबरोबर बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये सात टक्के गुण असतील तर कृषी क्षेत्रातील विषयांमध्ये पदवी धारण केलेली असावी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर करू शकता.

जसे की बीए बीकॉम बीएससी बीसीए किंवा इतर कोणत्याही तीन वर्षाचे किंवा चार वर्षाची पोरगी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर तुम्हाला बेसिक संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे व एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Gramsevak Exam Pattern [ ग्रामसेवक परिक्षा स्वरूप ]

ग्रामसेवक परीक्षा पद भरतीसाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता अंकगणित आणि कृषी तांत्रिक या विषयांचा अभ्यास करावा लागतो. ग्रामसेवक परीक्षेत 100 प्रश्न असतात त्यात प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात. व यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असतो.

विषयप्रश्न संख्यागुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
अंकगणित व बुद्धिमत्ता1530
कृषी व तांत्रिक4080

Gramsevak Syllabus [ ग्रामसेवक परीक्षा अभ्यासक्रम ]

1] मराठी मध्ये समाविष्ट अभ्यासक्रम –

समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द

शब्दांच्या जाती

प्रयोग

म्हणी

समास

संधी

वचन

अलंकार

शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा

विभोक्ता

विभक्ता

वाक्यप्रचार

विरामचिन्ह

2] इंग्रजी

Speech components

synonyms and antonyms

tense

voice that are active and passive

Phrases And Idioms

a single word replacement

sentence

speech that is both direct and indirect

3] सामान्य ज्ञान :-

पंचायत राज

इतिहास व भूगोल

समाजसुधारक

राज्यघटना

सामान्य विज्ञान

अर्थशास्त्र

चालू घडामोडी

4] अंकगणित व बुद्धिमत्ता :-

बेरीज

वजाबाकी

गुणाकार

भागाकार

सरळ व्याज

नफा व तोटा

काळ-काम-वेग

दशांश अपूर्णांक

वर्ग वर्गमूळ

घन घनमूळ

लसावी मसावी

संख्या मालिका

अक्षर मालिका

सांकेतिक भाषा

तर्क व अनुमान

नातेसंबंध

आकृत्यावरील प्रश्न

दिशा

कालमापन

विसंगत घटक

रांगेतील क्रम

5] कृषी व तांत्रिक

मृदा व जल व्यवस्थापन .

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय

सहकार पतपुरवठा

मत्स्य व्यवसाय

महाराष्ट्रातील पिके

फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान

कृषी संशोधन संस्था

कृषी अवजारे

इत्यादी विषयांवर तुम्हाला ग्रामसेवक पद भरती मध्ये प्रश्न विचारले जातात.

Gramsevak Bharti FAQ

ग्रामसेवक कशाप्रकारे बनता येते?

ग्रामसेवक पदी निवड होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर होणे आवश्यक आहे पदवीधर झाल्यानंतर तुम्ही ग्रामसेवक पदासाठी अर्ज करू शकता.

ग्रामसेवकाचा पगार किती असतो?

ग्रामसेवकाला सुरुवातीला कामावर रुजू झाल्यावर त्याला 7000 ते 21000 रुपयांपर्यंत पगार त्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देण्यात येतो.

ग्रामसेवकाचे काम काय असते?

ग्रामसेवक हा महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे ग्रामसेवक हा गाव पातळीवर काम करतो जसे की कर वसूल करणे, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास, गाव विकासाची कामे करणे, साफसफाई व तसेच दिवाबत्तीचे काम करणे व अशा स्वच्छ भारत मिशन, महानरेगा , 14 वा वित्त आयोग प्रधानमंत्री आवास योजना स्मार्ट गाव या महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या योजना असतात त्या गाव पातळीवर व्यवस्थितपणे राबवल्या जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम ग्रामसेवक करत असतो. व तसेच गावातील रहिवाशांचे जन्ममृत्यू यांच्या नोंदी ठेवणे व विवाह नोंदणी ठेवणे, तसेच घरपट्टी इत्यादी ग्रामसेवकाला करावी लागतात. तसेच तो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

ग्रामसेवक म्हणजे नेमकं काय?

ग्रामसेवक म्हणजे ग्राम विकास अधिकारी [Village development Officer ]

सूचना– ग्रामसेवक भरती संबंधित माहिती मिळाल्यास लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचवण्यात येईल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment