भारतीय डाक विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-India Post Office Bharti 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

भारतीय डाक विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-India Post Office Bharti 2023

India Post Office Bharti 2023: मध्ये पुन्हा एकदा भारतीय डाक विभागात एकूण 12828 पदाची मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी 10 वी तील उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

या अगोदरची जी पोस्ट ऑफिस भरती होती ती डायरेक्ट तुमच्या दहावीच्या टक्क्यांवरती व त्यामुळेच खूप आशा उमेदवारांचे 10वी ला कमी टक्के असल्यामुळे सिलेक्शन होऊ शकले नाही पण आता पुन्हा एकदा भारत पोस्ट ऑफिस सर्कल मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे.
कशाप्रकारे परीक्षा स्वरूप असेल व एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

पदाचे नाव-ग्रामीण डाक सेवक-GDS

GDS India Post Office Bharti 2023

GDS India Post Office Bharti 2023:मध्ये एकूण 12828 पदांची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल.उमेदवारा ची 22 मे 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात देखील झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 ही असणार आहे.
तसेच जर उमेदवाराकडून अर्जात काही चूक झाली असता ती चूक दुरुस्त करण्याची संधी उमेदवाराला देण्यात येणार आहे.यासाठी तुम्हाला 12 जून 2023 ते 14 जून 2023 हा 02 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.

India Post Office Recruitment 2023 Details


थोडक्यात माहिती


Post office recruitment 2023 मध्ये GDS-Branch Post Master म्हणजेच (BPM) तसेच GDS-Assistant Branch Post Master (ABPM) या पदासाठी पदभरती निघाली आहे.
एकूण 12828 पदांसाठी पदभरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.
कुठे ठिकाण – संपूर्ण भारत
आता सुरू होण्याची तारीख – 22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
त्याचबरोबर अर्जात चूक दुरुस्त करण्याची तारीख – 12 ते 14 जून ही असणार आहे‌.
Clickअशाच प्रकारच्या भरती संबंधित माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Post Office Bharti 2023 Age Limit


Age limit for BPM [Branch Post Master]

11 जून 2023 रोजी उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्ष इतके असावे.

वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयात देण्यात आलेली खालील प्रमाणे.
एस.सी [S.C]तसेच एस.टी [S.T] उमेदवाराना 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
ओ.बी.सी [OBC] उमेदवाराना 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
त्याचबरोबर दिव्यांग [PWD] उमेदवारांसाठी 10 वर्ष सूट देण्यात आली आहे.
PWD +S.C/S.T -या उमेदवारांना 13 वर्षे सुट देण्यात आली आहे.
PWD + OBC – या उमेदवारांना 15 वर्षे सुट देण्यात आली आहे.

Assistant Branch Post Master Age Limit

11 जून 2023 रोजी उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्ष इतके असावे.

वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयात देण्यात आलेली खालील प्रमाणे.
एस.सी तसेच एस.टी उमेदवाराना 05 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
ओबीसी उमेदवाराना 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
त्याचबरोबर दिव्यांग [PWD] उमेदवारांसाठी 10 वर्ष सूट देण्यात आली आहे.
PWD +S.C/S.T -या उमेदवारांना 13 वर्षे सुट देण्यात आली आहे.
PWD + OBC – या उमेदवारांना 15 वर्षे सुट देण्यात आली आहे.

India Post office bharti 2023 Job Profile [ Work ]

Branch Post master job Profile [काम]


ब्रांच पोस्ट मास्टर ला आय.पी.पी.बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांचे जे काही दैनंदिन व्यवहार असतात ते देखील सांभाळण्याचं काम हे ब्रांच पोस्ट मास्टर करत असतात. त्याचबरोबर त्यांना काम करण्यासाठी फोन किवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी डिवाइस दिले जाते.

त्याचबरोबर आरडी एवढी यांचे खाते सांभाळणे व नवीन खाते कशाप्रकारे उघडता येईल त्या संबंधित सर्व प्रकारचा जो डेटा असतो तो गोळा करून ठेवणे.
त्याचबरोबर इंडियन पोस्ट पेमेंट बँक च्या ज्या ही काही सर्विस असतील त्या कशा प्रकारे सेल आऊट करता येतील. त्याचबरोबर जे काही स्टॅम्प असतील तेही विकून त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो.
रोजचा त्यांचा एक चार्ट रिपोर्ट असतो त्यानुसार त्यांना काम करावं लागतं.
त्याच बरोबर जे काही ऑनलाईन ट्रांजेक्शन असतात ते देखील ठेवायचा असतो.

Assistant Branch Post master job Profile [ Work ]

तर मित्रांनो बी पी एम चे काम हे थोडेफार सेमच असतात. जेव्हाही ब्रांच पोस्ट ऑफिस मध्ये ब्रांच पोस्ट मास्टर नसतो तेव्हा त्याची सर्व कामे ही असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर सांभाळत असतो.
तसेच काही असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर चे काम असतात ते देखील त्याला करावे लागतात.
जसे की त्याला ज्याही पोस्ट ऑफिसचे सर्विसेस आहेत स्टॅम्प,स्टेशनरी,कॉन्व्हेन्सी त्यांची मार्केटिंग करावी लागते. तसेच पत्रव्यवहार करणे मेल घरपोच करणे.त्याचबरोबर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे पेमेंट डिपॉझिट करणे इत्यादी.

India Post Office Bharti Education Qualification 2023

शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
या पदासाठी उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असावा.
त्याचबरोबर उमेदवारास संगणक हाताळण्याचे बेसिक ज्ञान असावे
उमेदवाराला अर्ज करणाऱ्या ठिकाणाची स्थानिक भाषे मध्ये शिकलेला असणे गरजेचे आहे.व त्याने दहावीला तो विषय घेतलेला पाहिजे.
त्या संबंधित परीक्षे चे प्रमाणपत्र असावे.
उदा: एम.एस.सी.आय.टी
त्याचबरोबर उमेदवाराला सायकल तसेच दोन चाकी वाहन चालवता आले पाहिजे.

India Post Office Bharti 2023 Salary

Branch Post Master and Assistant Branch Post Master या दोन्ही पदांची salary structure वेगवेगळ्या असणार आहे.
ब्रांच पोस्ट मास्टर [BPM] पदासाठी सुरवातीला 12,000 ते 29,380 असू शकतो.
Branch Post Master Salary Is 12,000 Upto 29,380/-

असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ABPM] पदासाठी सुरवातीला 10,000 ते 24,470 असू शकतो.
Assistant Branch Post Master Salary Is 10,000 Upto 24,470/-

How To Apply India Post Office Bharti 2023

How to Apply BPM And ABPM
Application Are To Be Submitted Online Only.
ब्रांच पोस्ट मास्टर तसेच असिस्टंट पोस्टमास्टर या पदासाठीचे अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक करायचं आहे.
अर्ज करण्याआधी तुम्हाला नोंदणी करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला काही सूचना असतील त्या वाचून तुम्ही अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.
संपूर्ण माहिती तसेच कागदपत्र अपलोड केल्यानंतर व अर्ज शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.

Important document for India Post Office Bharti 2023

दहावी चे प्रमाणपत्र.
जर तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडत असाल तर त्याचे प्रमाणपत्र.
पीडब्ल्यूडी [PWD] प्रमाणपत्र.
जन्माचा दाखला.
त्याचबरोबर उमेदवाराकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

सूचना


अधिक माहितीसाठी खाली दिलेली Pdf पाहू शकता.

Important dates for GDS Post Office Bharti 2023

GDS-BPM/ABPM Application Start Date22/05/2023

GDS-BPM/ABPM Application Last Date11/06/2023

GDS-BPM/ABPM Bharti 2023 Important Links

GDS-BPM/ABPM Pdf Link – Click Here

GDS-BPM/ABPM Direct Online Apply – Click Here

GDS-BPM/ABPM Official Website – Click Here

जर तुम्हाला आमची ही नोकरी संदर्भातील माहिती आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुमच्या मित्रांन सोबत शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कोणालातरी सरकारी नोकरी भेटू शकले.
अशाच प्रकारच्या मोफत राज्य सरकारी तसेच केंद्र सरकारी नोकरी संदर्भात माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात.जेणेकरून अशाच प्रकारच्या नोकरी संदर्भात माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “भारतीय डाक विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-India Post Office Bharti 2023”

Leave a Comment