Ladki Bahin Yojana Approved Account la Paise Kadhi Yenar: माझी लाडकी बहीण योजनेचे तुमच्या अर्ज मंजूर झाला आहे पण तरी देखील अजून तुमच्या अकाउंट वर तीन हजार चा पहिला हप्ता आला नाही. तर तुम्ही जर ही सेटिंग केली तर तुमच्या अकाउंट वरती पैसे येऊ शकतात? तर चला पाहूया नेमकं तुम्हाला काय करायचं.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मंजूर झाला असून पैसे आले नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता.
Ladki Bahin Yojana Aadhar Link : जर तुमचा सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. तुमचा अर्ज मंजूर झालाय पण तुम्हाला पहिले हप्त्याचे तीन हजार रुपये आले नाही तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का हे पाहू शकता.
यासाठी तुम्हाला आधार सिडिंग म्हणून ऑप्शन तुमच्या chrome ब्राउझर मध्ये सर्च करायचा आहे. हे ऑप्शन आल्यानंतर त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार लॉगिन करायचा आहे.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालती आधार शेडिंग म्हणून ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या आधार नेमकं कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला कळेल अकाउंट वरती पैसे येण्यासाठी हे तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह असला पाहिजे जर तो ऍक्टिव्ह नसेल कदाचित त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येत नसेल. किंवा जर तो स्टेटस मध्ये दिसत असलेली बँक खाते वेगळ्या असेल तर कदाचित तुम्ही अर्ज करताना दिलेल्या बँक खात्यात न जाता हे पैसे आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात देखील लावू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडील जर दोन-तीन बँक खात्याचे अकाउंट असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता कदाचित तुमचं दुसरच अकाउंट आदर्श लिंक असेल त्यामुळे तुम्ही हे करून बघू शकता.
त्यानंतर अजून एक पद्धत आहे ज्याने तुम्ही आधार कार्ड च्या मूळ वेबसाईटवर जाऊन खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कंजूमर म्हणून ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही माय आधार सिडिग जो ऑप्शन आहे.त्यावरती क्लिक करून संपूर्ण माहिती भरू शकता.
Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnaar- तर मित्रांनो आपण या अगोदरच लाडकी बहीण योजना संबंधित संपूर्ण माहिती घेतली आहेत पण आता आपण जाणून घेणार आहोत आपल्याला नेमके या योजनेतील दरमहा येणारे पंधराशे असे दोन महिन्यांचे ३०००/- रुपये केव्हा आपल्या अकाउंट मध्ये येणारे त्या संबंधित माहिती आज आपण पाहणार आहोत. तसेच जो लोकांमध्ये संभ्रम आहे की हे तीन हजार रुपये आपल्याला 17 तारखेला नेमके भेटतील की नाही यासंबंधी माहिती पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट – महाराष्ट्र राज्यातील महिलांना घराच्या आर्थिक परिस्थितीला हातभार तसेच स्वखर्चासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही लाडकी बहिणीची योजना आहे. तिचे उद्दिष्ट आहे की राज्यातील महिलांना आपल्या स्वखर्चासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला वहिला ३,०००/- रुपयांचा हप्ता हा येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या अकाउंट वरती जमा होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या खरच सक्षम होणार आहेत. कारण ही योजना पुढे निरंतर अशीच सुरू राहणार आहे. येत्या 17 ऑगस्टला पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात जुलै तसेच ऑगस्ट महिन्याच्या म्हणजेच या दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येणार आहे.
व अजून पर्यंत ज्या महिलांचे अर्ज एक्सेप्ट झाले नाही त्या महिलांना जेव्हा त्यांचा अर्ज एक्सेप्ट होईल याच्यानंतर एकदम हे तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे .त्यामुळे अशा महिलांनी चिंता करायची नाहीये कारण जेव्हा तुमचा अकाउंट अप्रूव्ह होईल तुम्हालाही हा पहिला हप्ता दिला जाईल.
तुला माझी लाडकी बहिणी योजना पैसे कधी येणार या संबंधित माहिती सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी काही अटींचा उल्लेख देखील इथे करण्यात आला आहे.
यामध्ये पहिली अट अशी आहे की, ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शासन दरबारी मंजूर झाले आहे. अशाच महिलांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्टला पैसे पाठवले जातील.
तसेच या योजनेसंदर्भात 17 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा घेतला जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 31 ऑगस्ट पर्यंत येणाऱ्या अर्जांची प्रोसेस अशाच प्रकारे चालू राहील.
तसेच अजून पर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजना 2024 साठी अर्ज केला नसेल तर अशा महिलांना 31 ऑगस्ट 2024 च्या आत अर्ज करायचा आहे नाहीतर यानंतर तुम्ही अर्ध करू शकणार नाही.
या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांची यादी देखील महाराष्ट्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आली होती त्या यादी संबंधित माहिती देखील तुम्हाला आपल्या आजच्या लेखात खालती पाहायला भेटेल जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती माहिती तसेच यादी पाहू शकता.