Maharashtra Police Bharti 2023 Update-Police Bharti 2023 Gr Update

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra Police Bharti 2023 Update -तर मित्रांनो लवकरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पोलीस दलात पद भरती केली जाणार आहे.याबाबतचे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत GR देखील आला आहे. या जीआर नुसार मुंबई शहर व घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण 52056 पद ही भरायचे आहेत.व लवकरच भरती बाबतचे सर्वकाही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू देखील होईल. त्यामुळे सर्व जे उमेदवार पोलीस भरती ची तयारी करत आहेत त्यांनी आतापासूनच सर्व काही गोष्टींची तयारी करायचे आहे जसे की प्रॅक्टिस झालं नंतर डॉक्युमेंट या सर्व गोष्टी तुम्हाला आतापासूनच सुरुवात करायची आहे जेणेकरून जेव्हाही भरती बाबत अधिकृत सूचना येईल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही कागदपत्र वेळे अगोदरच असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही आत्तापासूनच सर्व काही तयारीला सुरुवात केली तर वेळ अगोदरच तुमचा जो काही अभ्यास असेल तो देखील पूर्ण झालेला असेल.त्यामुळे पुढे जाऊन हाच तुमचा प्लस पॉइंट सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे थोडाही विलंब न करता तुम्ही आजपासूनच सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यास प्रॅक्टिस साठी सुरुवात केली पाहिजे.
जे ही उमेदवार पोलीस भरती 2023 साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी.

Police Bharti 2023 Update

Police Bharti 2023 Update मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा उमेदवारांना असणार आहे.

त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Maharashtra Police Bharti 2023 | Police Bharti 2023 Update| Police Bharti Notification 2023 | Police Bharti 2023 Online Form Police Bharti 2023 Document | Police Bharti Qualification | Maharashtra Police Recruitment 2023| Maharashtra Police Eligibility | Age Limit | Direct Apply Link | Maharashtra Police Bharti 2023 Marathi | Maharashtra Bharti 2023 Update

Police Bharti 2023 Gr Update

काही दिवसा अगोदर महाराष्ट्र गृह विभागा मार्फत जीआर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये व त्या विभागांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांच्या आढाव्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी जी समिती नेमली होती. त्या समितीनुसार निर्णयानुसार सुधारित बदल निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुंबई शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील घटक निहाय एकूण नियमित 52056 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यात बाबतचा हा सर्व काही जीआर असणार आहे.

Maharashtra Police Bharti Education Qualification

महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी 12वी उत्तीर्ण इतके असावे.

त्याचबरोबर उमेदवाराकडे चार चाकी वाहन चालवण्याचे LMV लायसन्स असावे. म्हणजेच लाईट मोटर वेहिकल लायसन्स जर उमेदवाराकडे हे लायसन्स नसेल तर भरती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत त्याला हे लायसन्स काढणे अनिवार्य असेल जर त्यांनी हे लायसन्स काढले नाही तर त्याला निवड यादीतून बाहेर काढण्यात येईल.

त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज करत असाल.

पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराकडे हलके वाहन चालवण्याचा म्हणजेच LMV – TR लायसन्स असावे. किंवा कमीत कमी या दोघांपैकी एक लायसन्स असावे.

Police Bharti Age Limit

महाराष्ट्र पोलीस दलात खुल्या प्रवर्गातील उमेदवार हा वयाच्या 18 ते 28 वर्षा पर्यंतच अर्ज करू शकतो.

जर उमेदवार एस.सी/एस.टी या प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना शासन निर्णयानुसार 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.

तसेच जर उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना शासन निर्णयानुसार 03 वर्ष अर्ज करण्यास सूट देण्यात आली आहे

प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला18 वर्ष28 वर्ष
मागासवर्गीय18 वर्ष33 वर्ष
प्रकल्पग्रस्त उमेदवार18 वर्ष45 वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवार18 वर्ष45 वर्ष
माजी सैनिक उमेदवार18 वर्षसशस्त्र दलात कालावधी अधिक 03 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार18 वर्ष55 वर्ष
अनाथ18 वर्ष33 वर्ष
तर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे.
प्रवर्गकिमान वयोमर्यादाखुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादामागास प्रवर्ग कमाल वयोमर्यादा
महिला उमेदवार18 वर्ष28 वर्ष33 वर्ष
खेळाडू उमेदवार18 वर्ष28+5वर्ष33+5 वर्ष
पोलीस पाल्या18 वर्ष28 वर्ष33 वर्ष
गृह रक्षक18 वर्ष28 वर्ष33 वर्ष
माजी सैनिकांनवर अवलंबून उमेदवार18 वर्ष28+3वर्ष33+3 वर्ष

Police Bharti Physical Qualification

नावउंचीछाती
पुरुष165 सेमी पेक्षा कमी नसावी.न उगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी.
व फुगवून जास्तीत जास्त 85 सेमी भरली पाहिजे.
महिला155 सेमी पेक्षा कमी नसावी.—-

Police Bharti Selection Process

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाते. आपण आता खालील प्रेमाने पाहूया.

लेखी परीक्षा व शारीरिक परीक्षा घेतली जाते.

या दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

अंतिम निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवले जाते. व त्यानंतर कागदपत्र तपासणी पात्र ठरतील अशा उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.

लेखी परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असते.

परीक्षा कालावधी हा एकूण 90 मिनिटांचा असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह मार्किंग नसते.

लेखी परीक्षेमध्ये एकूण चार विषया संबंधित प्रश्न उमेदवारास विचारले जातात.

हे सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपात असतात.

शारीरिक परीक्षा
इव्हेंट/प्रक्रियापुरूषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर30
धावणे100 मीटर100 मीटर10
गोळा फेक8.50 मीटर6.50 मीटर10
एकूण गुण50

Police Bharti Syllabus

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम खालील प्रमाणे असणार आहे.

यामध्ये एकूण चार विषयांचा समावेश असणार आहे.

विषयएकूण प्रश्नगुण
मराठी व्याकरण2525
अंकगणित2525
बुद्धिमत्ता चाचणी2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525

Police Bharti Document [पोलीस भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र]

पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भरतीच्या अंतिम दिनांक पर्यंत आवश्यक ती प्रमाणपत्र व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

SSC/HSC उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र असणे.

जन्म दाखला

रहिवासी प्रमाणपत्र

जातीचा दाखला.

जात वैधता प्रमाणपत्र.

एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल असल्यास.

महिला उमेदवार तसेच अजवा उमेदवार वगळता इतर मागासवर्गीयांसाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.

जर उमेदवार माजी सैनिक असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.

जर उमेदवार गृहरक्षक दलात असेल. तर तीन वर्ष कार्य केल्याचे प्रमाणपत्र.

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असल्यास.

भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र असल्यास.

पोलीस पाल्य प्रमाणपत्र असल्यास.

अंशकालीन प्रमाणपत्र असल्यास.

ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असल्यास.

एनसीसी प्रमाणपत्र इत्यादी.

इत्यादी कागदपत्र पोलीस भरतीच्या अर्जाच्या अंतिम दिनांक पर्यंत असले पाहिजे.

आसाम रायफल भरती 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Police Bharti Salary

पोलीस शिपाई पदासाठी चा पगार हा 21,700 ते 69,100 इतका असणार आहे.

Police Bharti 2023 Important Links 2023

Police Bharti 2023 Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा