Majhi Ladki Bahin Yojana-माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा, पात्रता, कोण कोणती कागदपत्रे लागतील पहा?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Majhi Ladki Bahin Yojana-माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे ते पाहू-तर ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील ज्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला आहेत व त्यांना आपल्या रोजच्या उदरनिर्वासाठी किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी नेहमी कोणावर अवलंबून राहावे लागते. सरकारद्वारे माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे अशा महिलांना थोडासा हातभार लावण्यासाठी दरमहा 1500/- रुपये देण्याची ही योजना आहे.
ज्या द्वारे या महिलांच्या जीवनात थोड्याफार प्रमाणात मदत होऊ शकेल व त्यांच्या इच्छा ते पूर्ण करू शकतील. याद्वारे महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांचे स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करत आहे. तर आता आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत की

खालील लेखामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील.

  • या योजनेचा फायदा काय?
  • कोणकोणत्या महिला उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
  • अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र पाहिजे?
  • योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख?
  • अर्ज करण्याची पद्धत काय?

1] लाडकी बहीण या योजनेचा फायदा काय?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला 18000 रुपये मिळतील.
तसेच या योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षभरात 03 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. याच पैशांमधून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घर खर्च तसेच आर्थिक परिस्थितीला हातभार लावू शकतील.

2] कोण कोणत्या महिला उमेदवार माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकतात-

जर तुम्हाला ही माझी लाडकी बहीण या योजने त सहभाग घ्यायचा असेल अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या पात्रता तसेच सर्व निकष पाहणे खूप गरजेचे आहे.

ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
नवीन जीआर नुसार वाढवण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार आता या योजनेसाठी उमेदवाराचे 18 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
तसेच तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराच्या घरी ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चार चाकी वाहन नसावे.

महत्त्वाची सूचना – लाडकी बहिणी या योजनेचा लाभ एका घरातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच घेता येईल.

3] माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी उमेदवाराकडे असायला हवी अशी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र/दिवस प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला
  • जर उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर उमेदवार खालील कागदपत्रांची पूर्तता करू शकतो.
  • पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • जर अर्ज दाता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र द्यायचे आहे 15 वर्षांपूर्वीचे
  • तसेच इतर काही कागदपत्र जसे की – राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला

4] लाडकी बहिणी या योजनेसाठी अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज भरण्याची सुरुवातिची तारीख – 01 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

महत्त्वाची सूचना – 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै 2024 पासून दरमहा 1500/- लाभ देण्यात येईल.

5] माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय?

या योजनेसाठी अर्ज महिला उमेदवारांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
त्या संबंधित अधिक माहितीसाठी खाली माहिती दिली आहे.

तर जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही नारीशक्ती दूत ह्या ॲपवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल.
कारण खालील प्रमाणे
महत्वाची सूचना – अजून पर्यंत तरी महाराष्ट्र राज्यातर्फे माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे वेबसाईट पोर्टल ओपन करण्यात आलेले नाहीये.

माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत काय?

मात्र या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज मागविण्यात येत आहेत व ते तुम्हाला कशा प्रकारे भरता येईल ते देखील आपण पाहूया.

तर सर्वप्रथम ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करायचा आहे.

शहरी भागातील महिलांनी ज्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने.

शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वार्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे.

व सगळ्यात सोपा जर तुम्हाला मोबाईल फोन हातात येत असेल तर तुम्ही स्वतःच्या फोनवरून नारीशक्ती दूत नावाचा जो ॲप आहे. त्यावरून अगदी सहजरित्या दहा ते पंधरा मिनिटात स्वतःचा अर्ज भरू शकतात.

हे पण वाचा – माझा लाडका भाऊ योजने संदर्भात संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा , पात्रता काय, लगेच पहा

तर पाहूया कशाप्रकारे तुम्हाला ॲप मध्ये माझी लाडकी बहिण या योजनेसाठी अर्ज करू शकता.

तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये प्ले स्टोर मधून नारीशक्ती दूत या नावाचा ॲप डाऊनलोड करायचा आहे.
यानंतर तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवार महिलेच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर रिडायरेक्ट होणार.
त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना अशा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेज वरती रिडायरेक्ट होशाल.
आता तुमच्यासमोर माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याचे पेज ओपन होईल.
इथे तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितरित्या अपलोड करायची आहे.
माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून अपलोड करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही कागदपत्र व्यवस्थित आहेत याचे एक हमीपत्र ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
व त्यानंतर माहिती जतन करा म्हणून तो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करायचा आहे.

अशाप्रकारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही माझी लाडकी वहिनी या योजनेमध्ये तुमचा अर्ज स्वतः घरबसल्या भरू शकता.

FAQ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ काय आहेत?

तर या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला 18000 रुपये मिळतील.
तसेच या योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षभरात 03 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. याच पैशांमधून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घर खर्च तसेच आर्थिक परिस्थितीला हातभार लावू शकतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते अर्ध कशा प्रकारे करू शकतो?

माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा वापर करू शकतात.

सर्वप्रथम पाहूया की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे.
तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये नारीशक्ती दूत नावाचा हा ॲप डाऊनलोड करायचा आहे जो की तुम्हाला प्ले स्टोर वर मिळेल व त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा माझी लाडकी बहीण योजना चा अर्ज करू शकता.

माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत पाहूया

जर तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला

सर्वप्रथम जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत तसेच अंगणवाडी सेविकांच्या द्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

तसेच जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्ही तुमच्या शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वार्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment