म्हाडाच्या 2000 घरांची निघते लॉटरी आता तुमचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार आहे पूर्ण चला पाहूया नेमकी लोकेशन आणि किंमत

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mhada Lottery 2024 –आजच्या बदलत्या युगामध्ये मुंबईमध्ये घर घेण्याची स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो पण आता हे स्वप्न बघणं जितकं झालंय तितकं ते सत्यात उतरवणे सोपे राहिले नाही पण आता मात्र म्हाडाच्या या नवीन मुंबई हाऊसिंग लॉटरी मध्ये च्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईत नाही तर मुंबई शहरात किंवा त्या उपनगरात कमी खर्चात घर मिळावे आपले घर असावे हे प्रत्येक मुंबईकराची अपेक्षा असते. तर तुम्ही देखील हीच इच्छा बाळगून आपला हा लेख वाचत असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. कारण ह्या 2024 मध्ये तुमचं स्वतःच्या हक्काचं मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. तर ते कसं ते आता पण खाली पाहूया.
तर महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच महाडा गृहनिर्माण लॉटरी 2024 च्या माध्यमातून तुम्ही तुमचा मुंबईमधील स्वतःच्या हक्काचे घर मिळवू शकता. येत्या सप्टेंबरमध्ये सुमारे 2002 हजार घरांसाठी म्हाडा कडून लॉटरी काढली जाऊ शकते. या लॉटरीमध्ये गोरेगाव तसेच इतरही काही ठिकाणातील आलिशान तसेच मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या घरांचा समावेश आहे.

Mhada Upcoming Lottery News
तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या वर्षी मुंबई मंडळाच्या लॉटरीला नागरिकांनी नेहमीप्रमाणे खूप चांगला प्रतिसाद म्हाडा गृहनिर्माण संस्थेला दिला होता. यामध्ये तब्बल 400082 घरांसाठी 1.22 लाख लोकांनी अर्ज करून आपले नशीब आजमावले होते. तर ज्या लोकांना त्या लॉटरीमध्ये घर लागू शकले नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही म्हाडा करून सुवर्णसंधीत असणार आहे व ते आपलं मुंबईमध्ये हक्काचा घर स्वप्न सत्यात उतरव शकणार आहेत. म्हाडाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार म्हाडा तर्फे मुंबईमधील विविध लोकेशनवर तयार होत असणाऱ्या घरांची संख्या तसेच घरांची कामे कुठपर्यंत झाली आहेत याची माहिती गोळा केली जात आहे.अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये दोन हजार घरे तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या दोन हजार घरांची माढा तर्फे लॉटरी निघू शकते.


मागील वर्षे निघालेल्या लॉटरी मधील अंदाजे 150 घरांची विक्री अद्याप देखील झालेली नाहीये. माहितीप्रमाणे मागील सोडती मधील 196 अर्जदारांकडे एकापेक्षा जास्त घरे होती त्यामुळे म्हाडाच्या नियमानुसार कोणत्याही अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त घरे असू शकत नाही त्यामुळे ती घरे त्या अर्जदारांना पुन्हा सिलेंडर करावी लागली तसेच काही लोकांचे कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे अशा विजेत्यांना देखील प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले त्यामुळे असे घरेही शिल्लक आहेत.


आता या लॉटरीमध्ये गोरेगाव येथील म्हाडाच्या 332 घरांचा समावेश येणाऱ्या लॉटरीमध्ये होणार असून ही घरे मात्र उच्च तसेच मध्यमवर्गीय श्रेणीतील असतील. या घरांचा क्षेत्रफळ वर्गीकरणानुसार सुमारे 979 चौरस फूट आणि मध्यमवर्गीय सुमारे 714 चौरस फूट असेल किंमत एक कोटी 25 लाख इतकी असू शकते तर मध्यमवर्गीय घराची अंदाजे किंमत 80 लाख रुपये इतकी असू शकते.


या इमारतींमध्ये प्रथमच महाडा तर्फे विजेत्यांना खूप अशा नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळेच या घरांची किंमत तुम्हाला वाढलेली दिसून येत असेल.
तर आता आपण पाहूया नेमक्या कोणकोणत्या सोयी सुविधा तुम्हाला या इमारत मध्ये पाहायला भेटतील. गोरेगाव येथील प्रेम नगर भागामध्ये या इमारतींमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल जिम तसेच पार्किंग मध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट ची व्यवस्था केली जाणार असून या लोकेशन मधील 80 टक्के घरांचे काम पूर्ण झाले आहे व सध्या हे काम अंतिम टप्प्यांमध्ये चालू आहे माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होतील

आता पाहूया की महाडा तसेच सिडको लॉटरी साठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल
उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आयटीआर
जात प्रमाणपत्र जर कास्ट मधून अर्ज करायचा असेल तर
शपथ पत्र
तसेच मोबाईल नंबर व ईमेल आयडी
वरील दिलेले सात ते आठ कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील म्हाडाचा जो ऑफिशियल ॲप आहे त्यामध्ये जाऊन सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे व रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला हे सर्व जे कागदपत्र आहे त्याचे ॲप मध्ये फोटो काढून अपलोड करायचे आहे व जेव्हाही पुढे जाऊन म्हाडाची लॉटरी जाहीर होईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट एका क्लिक वरती त्या स्कीम साठी किंवा त्या लॉटरी साठी अर्ज करू शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment