Mhada Mumbai Lottery Ragistration Problem Solve | आता रजिस्ट्रेशन पद्धत होणार सोपे

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mhada Mumbai Lottery Ragistration Problem Solve तर मित्रांनो इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबई महाडा मंडळाच्या लॉटरीचे तारीख जाहीर झाली लॉटरी सुरू झाली पण यामध्ये काही तांत्रिक अडचणी खूप प्रमाणात लोकांना त्रस्त करीत आहेत. 

यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळी होणारे डीजी लॉकर कडून डॉक्युमेंट चेकिंग मध्ये येणारे अडथळे व एररस. 

यामुळे नागरिकांना महाडा लॉटरी मध्ये रजिस्ट्रेशन मध्ये खूप प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. रात्री दीड दोन तीन वाजेपर्यंत बसून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायचा प्रयत्न करून देखील यामध्ये त्यांना यश येत नाहीये.

तसेच spouse information आधार व्हेरिफिकेशन होण्यामध्ये देखील खूप प्रकारे प्रॉब्लेम जाणवत आहेत. याचा परिणाम असा की, आज म्हाडा लॉटरी जाहीर होऊन. नऊ दिवस झाले आहेत तरीदेखील आत्तापर्यंत फक्त अडीच ते तीन हजार इतकेच अर्ज महाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये रजिस्टर झाले आहे. त्यामुळे याचा कुठे ना कुठे तोटा देखील म्हाडा सहन करावा लागणार आहे.

यामध्ये नागरिकांना वेगवेगळे प्रॉब्लेम ला सामोरे जावे लागत आहे. 

जसे की जर एखादा विवाहित व्यक्ती असेल तर त्याला त्याच्याबरोबरच त्याच्या बायकोचे किंवा तिच्या पतीचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड याची माहिती म्हाडाला द्यावी लागते आणि ही माहिती त्यांना डिजिलॉकर मार्फत व्हेरिफाय करावी लागते पण यात होतय असं की जेव्हा इथे डिजिलॉकरवर व्हेरिफिकेशन ला जाते. तेव्हा डॉक्युमेंट वेरिफिकेशन होऊन देखील त्यांना something want wrong try again later असा मेसेज पॉपअप होतो. त्यामुळे त्यांना आपल्या डॉक्युमेंट मध्ये कोणत्या प्रॉब्लेम आहे किंवा त्रुटी आहे हे समजू शकत नाही. याच कारणास्तव कित्येक नागरिकांचे रजिस्ट्रेशन पासून वंचित आहेत. 

अशा प्रॉब्लेमला सॉल करण्यासाठी म्हाडा च्या कस्टमर केअर नंबर वर कॉल केला असता त्यांच्याकडून अशी माहिती दिली जाते की तुमच्या डॉक्युमेंट मध्ये नावात काहीही मिस्टेक किंवा एखादी स्पेलिंग चेंज किंवा एक्स्ट्रा असेल तरी देखील असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये कशाप्रकारे बदल करून घ्या.

Mhada Lottery Ragistration Problem Solve –

पण आता आम्हाला सूत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे लवकरच म्हाडा मुंबई मंडळामार्फत रजिस्ट्रेशन करताना डीजी लॉकर मार्फत जे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड चा वेरिफिकेशन केलं जातं ती प्रोसेस आता बंद केली जाणार आहे. जेणेकरून आतापर्यंत रजिस्ट्रेशन न करू शकलेले उमेदवार रजिस्ट्रेशन करू शकतील. अशी माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 

त्यामुळे ज्याही नागरिकांनी अजून पर्यंत अर्ज करू शकले नाहीये रजिस्ट्रेशन करू शकले नाहीये.त्यांनी काहीच चिंता करायची गरज नाहीये. कारण येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला या प्रॉब्लेम पासून मुक्तता मिळणार आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment