MPSC Student Success Story 2023-अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी ते उद्योग निरीक्षक अधिकारी पर्यंतचा प्रवास

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

MPSC Student Success Story 2023– महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची लेक तिच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याच्या लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरली आहे.इतकेच नाही तर मित्रांनो तिने अनुसूचित जाती जमातीतून राज्यात पहिली येणारे ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिने पाहिलेल्या तिच्या वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न तिने पूर्ण करून दाखवलं.वडिलांच्या कष्टांचं संपूर्णपणे चीज करून दाखला या लेकीने. या मुलीचे नाव आहे शालू शामराव घरत. तिच्या संदर्भातली आजची ही आपली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची यशोगाथेची ही सक्सेस स्टोरी असणार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली अधिकारी

शालू शामराव घरात हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून देखील तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवलं. लहानपणी वाचलेल्या एका धड्यामधील मुलगी जेव्हा एक अधिकारी होते तेव्हा तिच्या गावात जशी तिची मिरवणूक निघाली तशीच हुबेहूब मिरवणूक शालू शामराव घरात याची देखील निघाली. हे पाहून तिला असे वाटले की जणू आपण काही स्वप्नात पाहत आहोत. यामधून तिने जे दुसरे उमेदवार आहेत त्यांना काही गोष्टी देखील सांगितल्या की जर स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करायची जिद्द ही आपल्यालाच ठेवावी लागते.स्वप्न हे डोळे उघडे असताना पहा नाकी झोपते वेळी पाहिलेले स्वप्न नसत.उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न तुम्हाला झोपून देत नाही.

आता उद्योग निरीक्षक पद भूषवणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट क मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून तिचा राज्यात पहिला क्रमांक आला. व आता ती पुढे जाऊन उद्योग निरीक्षक हे पद भूषवणार आहे. यासाठी तिला जॉब दर्शक टीमकडून खूप खूप शुभेच्छा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 आताची मोठी बातमी पाहण्यासाठीइथे क्लिक करा

घरच्या बिकट परिस्थितीवर केली मात

तिने आपल्या यशातून सर्व उमेदवारांना दाखवून दिलं की मनामध्ये जर स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीला मात देऊ शकतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने तसेच वडील अल्पभूधारक असल्याने तिने आपले स्वप्न पूर्ण करण्यास कोणतीही कसं सोडली नाही. तिने आपल्याशी यशामध्ये तिच्या वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे हे देखील सांगितले कारण वडिलांच्या खंबीर पाठिंबा शिवाय ती हे यशाचे इतके मोठे शिखर गाठू शकली नसती असे तिथे म्हणणे आहे. तिचा हा प्रवास खूप खडतर व बिकट जरी असला तरी त्यामध्ये तिला तिच्या वडिलांची खूप मोठी साथ लाभली त्यामुळे ती हा प्रवास जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करू शकली. चिमूर तालुक्यातील पांढरवाडी गावची शालू शामराव घरात तिने अक्षरशा एमपीएससीमध्ये आपला डंका वाजवला आहे. तिने असं काही करून दाखवलं की अक्षरशा अनुसूचित जमाती प्रवर्गातून ती राज्यात पहिली आली आहे.
यामध्ये तिला देखील खूप चढ उतारांचा सामना करावा लागला यामध्ये घरचे लोकांचे देखील दिला खूप बोलणे ऐकावे लागले. व मध्ये तर एकदा तिने स्पर्धा परीक्षेच्या बाबत विचार करण्यास सोडून दिलं होतं. पण जेव्हा तिच्या एका सरांनी तिला आत्मविश्वास दिला किंवा एका टायमाच्या आलेल्या अपयशाने खचून जायचं नसतं कारण यश वापस हे जीवनामध्ये येतच असत. त्यावेळेस शिक्षकांनी तिला धीर दिला व तू नक्की काहीतरी करू शकशील अशी तिला हमे दिली.

आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

जेव्हा तिने तिच्या वडिलांना स्पर्धा परीक्षेसाठी तिला बाहेर जिल्ह्यात जायचं आहे असे सांगितले व त्यासाठी तिला एक लाख रुपये लागतील असे सांगितले तेव्हा थोडाही वेळ न लावता वडिलांनी लगेच तु जा पैशाचा मी बघतो.असे सांगितले. तेव्हा शालू नाही मनात स्वतःला म्हटले की आज हे वडिलांनी आपल्याला लाख रुपये दिले त्याचे मी तुम्हाला वर्षातच परत करील. व अशा प्रकारे तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. वडिलांनी तिच्यावर एवढा काही विश्वास दाखवला त्याचा तिला विश्वासाचं कुठेतरी चीज करून दाखवायचं होतं
जेव्हा ती गावात आली तेव्हा गावकऱ्यांनी तिचे हर्ष उल्हास आणि स्वागत केले. त्यावेळेस केलेल्या तिच्या भाषणात तिने एक लहानपणी वाचलेल्या पुस्तकातील गोष्टीबद्दल सांगितले विद्यार्थिनी जेव्हा अधिकारी होते तेव्हा अक्षरशा तिच्या गावातले सर्व लोक तिचं खूप मोठ्या कौतुकाने स्वागत व तिची मिरवणूक काढतात. तीच गोष्ट आता तिच्यावर घडत आहे हे तिचा विश्वासच बसत नव्हता. जणू काही सर्व काही त्या पुस्तकातील गोष्टी प्रमाणे घडत आहे असा तिला वाटलं.
वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या शालू ने यशाचा असा काही ध्यास घेतला की तिने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेक ते उद्योग निरीक्षक अधिकारी

यामध्ये शालू ने हे सांगायला सुद्धा मागे पुढे पाहिले नाही की मनामध्ये जी एमपीएससी बद्दल असणारी भीती धडपण हे इतकं मोठं झालं आहे पण जर आपला ठाम विश्वास व काही करून दाखवण्याची क्षमता असेल तर ही भीती किंवा हे दडपण आपल्याला काहीच वाटत नाही. दिल हे देखील सांगितलं की आज कित्येक लोक माझा बघत आहेत पण या यशा मागचा जो माझा संघर्ष आहे तो आज देखील मला आठवतो सांगतं तेव्हा अक्षरशः नजरेसमोर माझा जो सारा संघर्ष तो उभा राहतो. वय सांगताना तिच्या व तिच्या वडिलांच्या डोळ्यात आपोआपच आनंद अश्रू दाटून येतात व त्यांच्या चांगल्या वाईट दिवसांची प्रसंगाची एक जणू आपल्याला साक्षात करून देत आहेत.

आई-वडिलांच्या कष्टाचे ठेवले जान

यावेळेस तिच्या आई वडिलांना विचारले असता त्यांचे म्हणणे होते की तिने केलेल्या कष्टाचे हे तिला फळ मिळाले आहे अजून काही नाही. तसेच शालेय जीवनापासूनच ती खूप हुशार होती असे देखील तिच्या पालकांनी सांगितले.

त्याचबरोबर शालू नाही इतर काही एमपीएससी तसेच इतर कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या काही गोष्टी देखील सांगितल्या की महाराष्ट्र कित्येक विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वर येण्यासाठी झगडत आहेत अशा प्रत्येकांसाठी फक्त आणि फक्त एकच साधन आहे ते म्हणजे शिक्षण कारण शिक्षण हा अक्षरशः तळागाळातील व्यक्तीला ही समृद्ध बनवतो व शिक्षणामुळेच तुम्ही कितीही बिकट अशा परिस्थितीला मात देऊ शकता. चहुबाजूला तुमचा डंका वाजवू शकता. त्यामुळे माझ्या सर्व स्पर्धा परीक्षा देणार आहोत विद्यार्थी मित्रांना मी एकच सांगू इच्छिते अशी काही जिद्दीने मेहनत करा की आज जो महाराष्ट्रात चहुबाजूला माझा डंका वाजत आहेत तसाच येत्या काही दिवसाने तुमचे देखील डंका वाजला पाहिजे.
तसेच सामान्यतील सामान्य माणूस देखील किती असामान्य काम करू शकतो हे शालू ने आपल्या उदाहरणातून पटवून दिला तिची ही कथा अनेक उमेदवारांसाठी प्रोत्साहित करणारी असणार आहे.

MPSC Official Website Link – Click Here


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment