म्हाडाची 2000 घरांची लॉटरी निघेल या दिवशी: गोरेगाव पवई विक्रोळी येथील घरांचा समावेश

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mumbai Mhada Lottery Announcement 2024-म्हाडा मुंबई मंडळातील घरांना नागरिकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद भेटत असतो. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाची पुन्हा एकदा दोन हजार घरांची लॉटरी येणार आहे. व या घरांच्या लॉटरीमध्ये मुंबईमधील गोरेगाव वेस्ट येथील बांगुर नगर तसेच प्रेम नगर घरांचा जास्तीत जास्त समावेश असणार आहे. अशी माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे.

सर्वसामान्य नागरिक मुंबईमध्ये आपले स्वतःचे घर होऊ शकतं याची खात्री करून देणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या हक्काच म्हाडा मंडळ पुन्हा एकदा नवीन लॉटरी घेऊन येत आहे. या लॉटरीमध्ये तब्बल दोन हजार घरांचा समावेश असणार आहे.

Mumbai Mhada Lottery Announcement 2024

या घरांची किंमत किती असू शकते?
मुंबई म्हाडा मंडळ गोरेगाव भागातील घरांची किंमत ही कमीत कमी 34 लाखापासून सुरू होऊ शकते. अशी माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे.

Mumbai Mhada Lottery Announcement 2024

येत्या लॉटरीमध्ये गोरेगाव मधील बांगुर नगर प्रेम नगर येथे वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी ही घरे बांधले जात आहे. तसेच दक्षिण मुंबईतील विखरलेली घरी देखील या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. जसे की पवई विक्रोळी आदी ठिकाणी चा घरांचा समावेश केला.
तसेच येत्या काही दिवसांमध्ये या लॉटरी संदर्भात अधिकृत माध्यमातून महाडा मुंबई मंडळाची लॉटरी प्रसिद्ध होऊ शकते मात्र अधिकृत माध्यमातून अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे लॉटरी केव्हा निघेल या संदर्भात स्पष्टीकरण आलेली नाही. मात्र आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार घेत्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ह्या लॉटरीचा निकाल लागू शकतो.

म्हाडाच्या या लॉटरीचा विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच अर्ज भरून घेतले जाऊ शकतात तसेच अनामात रक्कम ही पूर्ण प्रोसेस केली जाऊ शकते मात्र रिझल्ट हा निवडणुकीनंतरच लागू शकतो. तसेच महाडा लॉटरी आता पूर्णपणे संगणकृत पद्धतीचा वापर करत असून यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता केली गेली आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये कोणताही मनुष्य छेडछाड करू शकत नाही. अशी हमी महाडा कडून देण्यात आली आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment