रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता बॅटमन करणार कारवाई

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

मुंबई उपनगर रेल्वे मध्ये १३ मार्च 2024 पासून बॅटमन मार्फत फुकट्या प्रवाशांवर चाप बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

बॅटमॅन पथक नेमकं आहे तरी काय?


Mumbai Western Railway -मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर फुकट्या प्रवाशांवर आळा बसवण्यासाठी रेल्वेने एक नवीन शक्कल लढवली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात फर्स्ट क्लास तसेच जनरल डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवासांचे संख्या झपाट्याने वाढत आहे व त्याचाच पर्याय म्हणून मुंबई रेल्वेने आता फुकट्या प्रवाशांवरती चाप बसवण्यासाठी एक नवीन संकल्पना शोधून आनली आहे. ज्याचे नाव आहे. बॅटमन पथक या पथकाचे मेन काम असणारे ही संध्याकाळच्या वेळेस जे पश्चिम मार्गावरून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड करणे. हे या पथकाचे प्रथम काम असणार आहे.
मित्रांनो यातील एक मजेशीर गोष्ट म्हणजे बॅटमॅन या पथकाची संकल्पना देखील एका रेल्वे प्रवाशाने सुचवली आहे.

कशाप्रकारे हे पथक काम करतात ते देखील आज आपण पाहूया?


या पथकाने कशाप्रकारे काम करावे या संदर्भात त्यांना. रेल्वे मार्फत व्यवस्थित असे प्रशिक्षण देण्यात आले आहे.कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचे तिकीट तपासावे तसेच संशयास्पद हालचाल करणाऱ्या प्रवाशावर लक्ष ठेवण्याचे काम या बॅटमन पथकामार्फत केले जाते. नियमितपणे पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या या संकल्पनेचे कौतुक देखील केले आहे. व या पथकाद्वारे लवकरच पश्चिम रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची चूक देखील कळेल व त्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. जेणेकरून प्रवासी आपले जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पडू शकतील. तसेच पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा हे देखील या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे.


13 मार्च 2024 पासून ते आज पर्यंत दोन रात्री मध्ये तब्बल 2300 फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या बॅटमॅन पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. व या कारवाई द्वारे तब्बल 6 लाख 30 हजार रुपये इतका दंड वसूल केला गेला आहे. संकल्पनेचे उद्दिष्ट आहे क जास्तीत जास्त लोकांना तिकीट काढून प्रवास करण्यासाठी जनजागृती केली जात आहे व कदाचित या दंडात्मक कारवाईमुळे तरी लोकांमध्ये तिकीट काढून प्रवास करण्याविषयी जागरूकता निर्माण होईल हेच या संकल्पनेचे मूळ उद्दिष्ट आहे.तसेच पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा हे देखील या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Link


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment