Police Patil Bharti 2023-महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2023-असा करा अर्ज:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या कितीतरी वर्षांपासून पोलीस पाटील ही रखडलेली भरती आता सुरू होण्याचे चिन्ह दिसत आहेत.लवकरच महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पदाची भरती होण्याची दाट शक्यता आहे, याबद्दल स्वतः कलेक्टर ऑफिस यांनी या भरतीच्या सध्या स्थितीबद्दल काही माहिती दिली आहे व याबद्दल अधिकृत जाहिरात ही येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला वृत्तपत्रात व त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला भेटू शकते जसे की सांगण्यात आले आहे.
त्यामुळे 15 मे किंवा 26 मे च्या आसपास आपल्याला या पदभरतीची जाहिरात पेपर मध्ये पाहायला भेटू शकते.त्यामुळे उमेदवारांनी तयारीत राहावे. तसेच उमेदवारांना व्यवस्थितपणे आपल्या अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिवशी परीक्षा घेतली जाईल यापासून ते केव्हा पासून अर्ज भरले जातील याबाबतची सर्व माहिती दिली आहे पण तरीपण जर काही अस्पष्ट अडचणी आल्यास तर तारीख मागेपुढे होऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, तर चला मग बघूया.
Police Patil Bharti 2023 Notification
कशाप्रकारे आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करायचा आहे,अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे की ऑफलाईन ,अर्ज करण्यास सुरुवातीची तारीख ते अर्जाची शेवटची तारीख.
अर्जासाठी किती शुल्क लागेल. तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील. पोलीस पाटील पदासाठीआ लागणारा अभ्यासक्रम.
Police Patil Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]
- अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असावा व त्याने अधिकृत अशा शासनमान्य विद्यापीठातून शिक्षण घेतले असल्यास तो उमेदवार पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करू शकतो.
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी | Click Here |
Police Patil Age Limit [ पोलीस पाटील पदासाठी वयाची अट ]
- पोलीस पाटील या पदासाठी तुमचे वय हे कमीत कमी 25 वर्षे इतके असावे. जास्तीत जास्त वय 45 वर्ष.
- [ SC/ST- उमेदवारांना :- 5 वर्ष सुट ]
- [ OBC उमेदवारांना :- 3 वर्षे सुट ]
Police Patil Selection Process [ पोलीस पाटील पदाची निवड पद्धत ]
मित्रांनो पोलीस पाटील पदाची निवड पद्धत महाराष्ट्र पोलीस खात्यामार्फत होते.
परीक्षेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागते.
मुलाखत.
त्यानंतर उमेदवाराची कौशल्य चाचणी होते.
Police Patil Salary [पोलीस पाटील पगार]
सुरुवातीच्या काळात तुम्हाला येथे 9500/- ते 34,000/- दर महिना वेतन भेटू शकते.
Police Patil Bharti Marathi Information [पोलीस पाटील पदाबद्दल थोडक्यात माहिती]
- मित्रांनो हे जे पद आहे हे गाव पातळीवर काम करणारे खूप जुनं पद आहे. शिवरायांच्या काळात देखील गाव पातळीवर हे पद अस्तित्वात होते या पदाचे काम गावचा कारभार कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक घटकांमधील तेढ सोडवण्याचा हे आहे.
- त्यानंतर इंग्रजांच्या काळात पोलीस पाटील या पदाकडे महसूल कायदा व सुव्यवस्था यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पोलीस पाटील करत असे.
- जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी नेमलेल्या काही वंशपरंपराग पदे रद्द करण्यात आली. व त्यानंतर 17 डिसेंबर 1967 रोजी पुन्हा एकदा पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता मिळाली.
- व आता या पदाचे काम गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे व सामाजिक घटकांमधील तेढ सोडवणे इत्यादी.
Maharashtra Police Patil recruitment 2023
- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 55 टक्के इतके पोलीस पाटलाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गाव पातळीवरती पोलीस पाटलाचा कामाची गती कमी झाली आहे.
- त्यामुळे पोलिसांची सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रारंभ उडत आहे. येत्या काही महिन्यांपासून राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकूण रिक्त जागा बाबतच्या माहितीसाठी.
- गाव पातळीवरील लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली आहे. त्यावरून भरतीचे निष्कर्ष ठरवण्यासाठी जे काही आरक्षणाचे मानबिंदू ठरविण्यास सोपे झाले व त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी अशाप्रकारे पुढची वाटचाल होईल याच्याबद्दल माहिती प्रसिद्ध केली.
- यानुसार 15 मे रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. व लगेच 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी तेथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तुम्हाला पाहायला भेटू शकते.
police Patil post information { पोलीस पाटील जागांचा तपशील}
यानंतर आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या किती रिक्त जागा आहेत.
तालुक्यांची नावे | एकूण जागांची संख्या |
---|---|
जामखेड | 45 |
कर्जत | 69 |
पारनेर | 108 |
अकोला | 71 |
संगमनेर | 66 |
राहुरी | 45 |
श्रीरामपूर | 19 |
कोपरगाव | 26 |
राहता | 83 |
नेवासा | 38 |
पाथर्डी | 82 |
श्रीगोंदा | 109 |
शेगाव | 37 |
Police Patil Exam Time Table {पोलीस पाटील पदभरतीची पद्धत }
- 15 मे रोजी महाराष्ट्रात जाहीरनामा प्रसिद्ध होणार.
- 16 मे ते 26 मे पर्यंत अर्ज भरण्याची प्रोसेस चालू राहील.
- 29 ते 30 मे ला अर्जांची तपासणी करण्यात येईल जेणेकरून फक्त पात्र उमेदवारांना पोलीस पाटील भरती परीक्षा देता येईल.
- त्यानंतर जेमतेम 5 जून 2023 रोजी लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते.
- व पाच दिवसांमध्ये म्हणजेच 200जून ला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.
- त्यानंतर 22 जून ला जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांच्या अर्ज करताना दिलेले कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली होती ते कागदपत्र पुन्हा व्यवस्थितपणे त्यांचे तपासणी केली जाईल.
- लगेचच पाच दिवसांनी पात्र झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर जे काही उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांची 27 जून रोजी तोंडी परीक्षा होईल.
- ही तोंडी परीक्षा झाल्यानंतर दोन दिवसांनी 30 जूनला लगेचच या सर्व निष्कर्षातून पात्र झालेल्या उमेदवारांचे अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
Police Patil required document list [ महत्त्वाची कागदपत्र ]
- शालांतर शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी दहावी बारावीच्या कागदपत्रांची ओरिजनल प्रत
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म तारखेचा दाखला यांची ओरिजिनल प्रत
- उमेदवार हा संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असल्याचा तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत कडून घर कर आकारणी पत्र किंवा शेतजमीन असलेला सातबारा उतारा व आठ अ उतारा इत्यादी लागतील.
- जर उमेदवार आरक्षित वर्गातील असेल तर संबंधित उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र ची सत्यप्रत जोडणे.
- कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे तलाठी ग्रामसेवक यांचा दाखला.
- दोन पासपोर्ट साईज फोटो जे की तुम्ही अलीकडील काही काळात काढले असावेत.
- कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात दंड अगर शिक्षा न झाली असल्याचे पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगले असल्याचे तेथील संबंधित पोलीस निरीक्षक सह पोलीस निरीक्षक यांचा दाखला.
application Fee for Police Patil Exam [अर्ज करण्यासाठी लागणारा शुल्क]
- जर उमेदवार खुल्या प्रवर्गात असेल तर त्याला पाचशे रुपये परीक्षा शुल्क लागेल.
- उमेदवार राखीव प्रवर्गातील असेल तर त्याला तीनशे रुपये परीक्षा शुल्क लागेल.
Online apply for Police Patil Bharti 2023
- अर्ज करण्यासाठी लागणारे अधिकृत वेबसाईटची लिंक्स मी तुम्हाला इथे खालती देईल.
- इच्छुक उमेदवाराने सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकृत साइटवर जायचं आहे.
- Mahapolice.gov.in इथे आल्यानंतर होम पेज मध्ये तू तुम्हाला न्यू रिक्रुटमेंट सेक्शन किंवा रिक्रुटमेंट सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला { Maharashtra Police Patil Bharti 2023 Notification } महाराष्ट्र पोलीस पाटील पदभरतीचे जाहिरात दिसेल.
- त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोलीस पाटील भरती संबंधित सर्व काही माहिती तिथे भेटेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचा फॉर्म ओपन होईल व त्यानंतर तुमची माहिती भरल्यानंतर तुम्हाला नवीन पेज वरती अर्ज शुल्क भरून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता.अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.
Police Patil Online Apply link – Apply Now Coming Soon
Police Patil FAQ
- पोलीस पाटील पदा संबंधित माहिती व पोलीस पाटील काय काम करतो?
- तलाठी तसेच पोलीस पाटील हे महसूल विभागातील गावपातळी वरील काम पाहणारे महत्त्वाची पदे आहेत.
- व त्यातील पोलीस पाटील हे पद कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. पण आता तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रात कित्येक दिवसांपासून या दोन्ही पदांसाठी भरती न झाल्यामुळे खूप पदे रिक्त झाले आहेत तलाठ्याची 479 तर पोलीस पाटलाची 822 पदे अशी एकूण तेराशे एक पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत.त्यामुळे इतर यंत्रणेवर कामाचा ताण पडला आहे.
Maharashtra Police Patil Bharti 2023
Maharashtra Police Patil Bharti notification
Maharashtra Police Patil Bharti in Marathi
Maharashtra Police Patil notification 2023
2 thoughts on “Police Patil Bharti 2023-महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2023-Apply Now”