ST एसटी– महामंडळाचा राज्यातील दळणवळणातील खूप मोठा हातभार असतो. व राज्यातील काही दिवसांपासून त्या परिस्थितीत नेहमीच त्यांच्या पगाराला विलंब होणे किंवा वेगवेगळ्या अशा समस्या त्यांना नेहमी उद्भवत होत्या त्यामुळेच त्यांनी गेल्या 48 तासांपासून पोखरलेला हा संप शेवटी मागे घेण्यात आला आहे. व त्यांच्या या संपाला घसघशीत असे पगारवाढीचा निर्णय त्यांच्या बाजूने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एसटी कर्मचारी संघटनेच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 6500 वाढ करण्यात आली आहे. तसेच सणासुदीच्या वेळेस हा संप पुकारला गेल्या असल्याने गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ झाली होती. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावं या त्यांच्या प्रमुख अशा मागण्या होत्या व इत्यादी प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी हा संप पुकारला होता. यापूर्वी देखील जेव्हा त्यांनी अशा प्रकारचे संप पुकारले होते तेव्हा सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी काम कर्मचाऱ्यांच्या विविध 13 संघटनांच्या समन्वय कमिटी सोबत बैठक पार पडली होती त्यावेळी देखील यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या.
नेमक्या काय होत्या त्या मागल्या आता आपण पाहूया?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना एक एप्रिल 2020 पासून सरसकट मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्यात यावी.
जुलै 2016 ते जानेवारी 2020 च्या कालावधीत प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घर भाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ लागू व्हावे.
वेतन वाढीसाठीच्या 2100 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप मिळावी.
वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू व्हाव्या.
कर्मचारी आणि कुटुंबीयांना एसटी फरक न करता एक वर्षाची मोफत पास सवलत मिळणार.
आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होऊ नये.
वरील सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य झालेल्या मागण्या आहेत.
आताच्या नवीन नियमानुसार एक एप्रिल 2020 पासून सरकार सरसकट एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 इतकी वाढ करण्यात येणार आहे. असेच एसटी कर्मचाऱ्यांच्या इतरही काही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातही सरकार सकारात्मक असून त्यावेळी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येते असे आश्वासन एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी दिले.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं या बैठकीकडे खूप ध्यानपूर्वक लक्ष होतं कारण की जर याचा तोडगा निघाला नाही तर हा पुढे चालू राहिला असता व त्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप भोगावे लागला असता. म्हणून ज्या बैठकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मी छंद पडळकर यांनी सांगितले की मी या सर्वांचे आभार मानतो तसेच एसटी महामंडळाने 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेतन वाढ करावी अशी मागणी सरकारकडे केली होती मात्र ही मागणी सरकार मान्य करत नव्हते. ज्या कर्मचाऱ्यांना 2021 च्या नोव्हेंबरमध्ये अडीच हजार चार हजाराने 5000 रुपयाची वाढ केली होती त्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकार 6500 रुपये वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.