IPL 2025 मध्ये सूर्यकुमार यादव सोडेल का मुंबई इंडियन ची साथ? कारण IPL 2025 मध्ये या संघाने दिली थेट कॅप्टन्सी ची ऑफर 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

SuryaKumar Yadav IPL 2025 – येत्या काही दिवसांमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेपूर्वी स्पर्धेतील खेळाडूंची मेगा ऑप्शन केली जाणारे ऑप्शन संदर्भात बीसीसीआयची चर्चा सुरू झाली आहे. तसेच आयपीएलच्या फ्रॅंचाईजी मालकांबरोबर बीसीसीआयची मूळ बैठक देखील झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आयपीएलच्या नवीन हंगामात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. 

SuryaKumar Yadav IPL 2025यामध्ये सर्वात मोठी माहिती अशी मिळत आहे की सूर्यकुमार यादव हा आईपीएल 2025 मध्ये कदाचित मुंबई इंडियन्स ला सोडून पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळताना त्याच्या प्रेक्षकांना दिसू शकतो. इतकंच नव्हे तर बहुतेक जातो नेतृत्वही करू शकतो.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादवला कोलकत्ता नाईट रायडर्स कडून अशा प्रकारची ऑफर मिळाली आहे की आयपीएल 2025 स्पर्धेसाठी कर्णधार पदाची अधिकृत माध्यमातून ऑफर देण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसांपूर्वीच 36 वर्षीय सूर्यकुमार यादवला भारताचा t20 कर्णधार करण्यात आले आहे.

तर दरम्यान याबाबत अद्याप स्वतः सूर्यकुमार यादव यांच्याकडून किंवा मुंबई इंडियन्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स किंवा बीसीसीआयकडून ह्या बातमीला अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाहीये. 

SuryaKumar Yadav IPL 2025  | सूर्यकुमार यादव IPL 2025 मध्ये सोडू शकतो मुंबई इंडियन्सची साथ

तसेच SuryaKumar Yadav IPL मध्ये मुंबई इंडियन्स साठी खेळण्या अगोदर तो कोलकाता नाईट रायडर्स कडून देखील खेळला आहे त्यामुळे त्याला कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळण्याचा चांगला अनुभव देखील आहे व जेव्हा तो कोलकाता नाईट रायडर्स मध्ये होता 2012 वर्षी तो एक सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यानंतर पुन्हा 2014 सली त्याला कोलकाता संघाने त्याला खरेदी केलं. 

तसेच यानंतर पुढे तो 2014 ते 17 या सालांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स खेळला असून 54 सामन्यांमध्ये त्याने 608 धावा पूर्ण केल्या. तसेच तो 2014 सली कोलकाता नाईट रायडर्स मध्ये त्याने विजेतेपद देखील भूषविले आहे.

मात्र त्यानंतर पुन्हा 2018 मध्ये पुन्हा एकदा ऑप्शन मध्ये मुंबईने त्याला खरेदी करून आपल्या संघामध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर असाच आयपीएलच्या सीजन येत राहिले व सूर्यकुमार यादव ने मुंबई इंडियन्स टीम मध्ये आपला एक प्रमुख स्थान निर्माण केला. मात्र आता काही दिवसांपासून आयपीएल 2025 च्या ऑप्शन अगोदर अशी चर्चा सुरू झाली आहे की सूर्य कुमारने मुंबई इंडियन्स साठी 18 सामने खेळले असून व त्यामध्ये त्याने 3033 धावा केल्या. 

जर आपण थोड्या वेळासाठी असा विचार करू की ह्या सर्व चर्चा सत्य आहेत? 

तर कोलकाता नाईट रायडर्स च्या सध्याच्या कॅप्टन श्रेयस च काय?

कारण श्रेयसच्या कॅप्टन सी मध्ये 2024 चा आयपीएलचा विनरचा किताब देखील त्याने पटकावला आहे. त्याला कॅप्टन सी वरून काढण्याचं कोलकत्ता नाईट रायडर्स कडे असे कोणते ठोस कारण नाहीये. 

वझर असे झाले व कोलकाता नाईट रायडर्स ने सूर्यकुमार यादवला आपल्या संघात समाविष्ट केले व त्याच्याकडे कर्णधार पदाचे नेतृत्व दिले तर श्रेयस ला सांगा मध्ये ठेवणार की त्याला करारमुक्त करणार किंवा त्याला खेळाडू म्हणून ठेवणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आईपीएल 2025 च्या ऑप्शन ची घोषणा झाल्यानंतर त्याची सत्यता कळू शकेल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment